छोट्या व मध्यम (SME) स्वरूपातील व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकांना देशात तसेच विदेशामध्ये त्यांचा व्यवसाय व्यापक प्रमाणावर वाढविण्यासाठी वेबसाइट ट्रांसलेटर 1.0 सोल्युशन ही एक नव-संजीवनी ठरू शकेल असे म्हणल्यास ती अतिशयोक्ती ठरू नये. वाढत्या जागतिकीकरणाच्या बरोबरीने तुमच्या व्यवसायाशी संबंधित वेबसाईट केवळ इंग्रजीमध्येच नव्हे तर बहुभाषांमध्ये अनुवाद स्वरूपात उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने लिंग्वासोलने वेबसाइट ट्रांसलेटर 1.0 तंत्रज्ञान विकसित केले आहे.
“वेबसाईट ट्रान्सलेटर 1.0 चा वापर करून तुम्ही तुमच्या वेबसाइटवरील उत्पादन व सेवांविषयी माहिती जागतिक स्तरावरील ग्राहकांपर्यंत उपलब्ध करून देऊ शकता.” असे लिंग्वासोलच्या व्यवसाय विभागाचे प्रमुख श्री. सुनील कुलकर्णी यांनी सांगितले.
लिंग्वासोलने सादर केलेल्या वेबसाइट ट्रांसलेटर 1.0 सोल्युशनमध्ये शंभराहून अधिक भारतीय तसेच परदेशी भाषांमध्ये अनुवाद करून देण्याची सुविधा उपलब्ध आहे.
लिंग्वासोल वेबसाइट ट्रांसलेटर 1.0 संबधित बातमी दिनांक ३ नोव्हेंबर २०१९ रोजी प्रकाशित झाली.
Ref. No- LSN11191006